Dhanashree Kolhe Pudhari
पुणे

Dhanashree Kolhe Corporator Election: प्रभाग ‘33 अ’ मधून धनश्री कोल्हेंचा विजय; अटीतटीच्या लढतीत भाजपची बाजी

ग्रामीण मुळांपासून शहरापर्यंतचा प्रवास; महिलांसाठी प्रशिक्षण, पाणीपुरवठा व वाहतूक कोंडी सोडवण्याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: माझे शिक्षण अवघे वी इतकेच असले, तरी आयुष्याच्या शाळेने बरेच काही शिकवले. पुरंदर तालुक्यातील गावचे सरपंच असल्याने बालपणीच राजकारणाचे धडे मिळाले. तसेच, सासरी देखील असेच वातावरण असल्याने निवडणूक सोपे गेले. पती दत्तात्रेय कोल्हे हे पोलिस खात्यातून घेऊन राजकारणात उतरल्याने हे आव्हान सहज आले. सतत जमिनीवर राहून प्रचार मी नगरसेविका होऊ शकले, अशी भावना प्रभाग क्रमांक ‌‘33अ‌’ मधूनच निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवार धनश्री कोल्हे यांनी केली.

प्रभाग क्रमांक 33अ‌ हा प्रभाग नव्यानेच तयार झाल्याने निवडणुकीत प्रचंड चुरस होती. प्रभागात एकूण मतदान हजार इतके झाले. यापैकी हजार इतके मतदान धनश्री कोल्हे यांना मिळाली. राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्षाच्या रश्मी घुले यांना देखील हजार मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत धनश्री यांनी बाजी मारली. चार पैकी जागांवर भाजप, तर इतर दोन जागांवर राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्षाचे उमेदवार निवडून आले. एकूणच, या प्रभागात अटीतटीची लढत भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग््रेास शरद पवार पक्षात झाली.

धनश्री म्हणाल्या, माझे पती दत्तात्रेय कोल्हे यांनी पासून भाजप ओबीसी सेलचे काम सुरू केले. राष्ट्रीय स्वयंसेवक काम ते मनापासून करू लागले. त्यांच्यासोबत मी देखील महिलांच्या शाखा काम करते. त्याची दखल आमदार भीमराव तापकीर यांनी घेतली आणि तिकीट दिले.

सामन्यांशी नाळ जोडून ठेवत्यानेच यशस्वी!

आम्ही दोघेही चार वर्षांपासून या प्रभागात घराघरांत संपर्क ठेवला. अत्यंत लोकांची कामे करण्याचा प्रयत्न केला. प्रामुख्याने संघाच्या काही शाखा सुरू करण्यात आम्ही पुढाकार घेतला. खास करून महिलांसाठी शाखेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले. त्यामुळे सामान्य नागरिकांशी नाळ सतत जोडून ठेवण्यात यशस्वी झालो. त्यामुळे मतदारांनी आमच्या भरघोस मते टाकली.

प्रभागाच्या विकासाचे संकल्प

  • वाहतूक कोंडी सोडवण्यावर भर देणार

  • कचरा प्रकल्पावर काम करणार

  • पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार, यावर लक्ष देणार

  • महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण देणार

  • तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी त्यात खास करून प्रशिक्षण वर्ग घेणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT