पुणे

देहूरोड : कोरड्या पडलेल्या ‘इंद्रायणी’ला ‘आंद्रा’ने दिले जीवदान

backup backup

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहूतील इंद्रायणी नदी उन्हाळ्यापूर्वीच आटू लागली होती. बोडकेवाडी येथून पाणी उपसा होत असल्याने पात्र कोरडे ठाक पडले होते. त्यामुळे देवस्थान आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी लक्ष घालून आंद्रा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीला आता पाणी आहे.

पाणी उपसाच्या ठिकाणी पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत देहूत पाणी टंचाई निर्माण झाली असती. ही बाब विचारात घेऊन देहूतील संत तुकाराम महाराज संस्थांनने 13 एप्रिल रोजी पत्र पाठविले होते.

पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली होती. या पत्राची तत्काळ दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश जाधव यांनी आंद्रा धरणाशी साधला.

त्यामुळे गुरुवारी आंध्रा धरणातून पाणी सोडण्यात आले. ते दोन दिवसांत देहूत पोचले. त्यामुळे पुढील काही दिवस पाणी टंचाई दूर झाली आहे. देहू ग्रामस्थांकडून पाण्याचे बिल भरले जात नाही.

त्यामुळे मुख्याधिकारी यांनी वसुली करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या प्रमाणात पाणी योजनेचा विस्तार करण्याची मागणी केली जात आहे.

माशांच्या जीवासाठी पाणी

इंद्रायणी नदीपात्रात काही दिवसांपूर्वी तळेगावच्या संस्थेकडून मत्स्य बीज सोडण्यात आले होते. आता हे बीज मोठ्या माशांत परावर्तीत झाले आहेत. या माशांच्या जीवासाठी नदीत पाणी असणे गरजेचे आहे.

SCROLL FOR NEXT