पिंपरी : तळवडे येथे स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्या कारखान्यात स्फोट होऊन आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात बर्न हॉस्पिटल नसल्याने उपचारासाठीचा अतिमहत्त्वाचा वेळ गेल्याने जखमींचा मृत्यू झाला, असा आरोप माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे. काटे यांनी सांगितले, की अशा दुर्घटना घडल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर जखमींवर उपचार करण्यासाठी शहरात पालिकेचे एकही बर्न हॉस्पिटल नाही.
तसेच, पालिकेच्या रुग्णालयात बर्न वॉर्डदेखील नाही. शहरात अशा दुर्घटना घडल्यास या जखमी रुग्णांवर उपचार करण्यासाठी ससून रुग्णालय किंवा इतर खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे आगीसारख्या दुर्घटनेतील रुग्णांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचे बळी जात आहेत. पालिकेने शहरात अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी बर्न हॉस्पिटल उभारावेत. तसेच, पालिकेच्या रुग्णालयात त्वरित बर्न वॉर्ड तयार करून सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा