दौंड: दौंड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९अ या जागे वरील निवडणुकीकरिता स्थगिती मिळाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलप्रसाद चव्हाण यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की प्रभाग क्रमांक ९ अ च्या उमेदवार रेणुका विजय थोरात यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो फेटाळल्यानंतर त्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली होती.
त्यामुळे या ठिकाणची निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी निलप्रसाद चव्हाण यांनी सांगितले.
बाकी सर्व प्रभागांमध्ये प्रक्रिया ही ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे होणार आहे त्यात कोणताही बदल नाही परंतु संपूर्ण निवडणुकीच्या मतमोजणी करता काय निर्णय घ्यावा?
याबाबत निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचेही निवडणूक यंत्रणेने सांगितले.