Janhavi Killekar angry at Suraj Chavan wedding
सासवड: बिग बॉस मराठी फेम सुरज चव्हाण नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. सुरजचा विवाह काल, सासवड येथील माऊली गार्डनमध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. 'बिग बॉस'मधील त्याची सहकलाकार आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनेही या सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र, लग्नाच्या या आनंदमय वातावरणात एक वेगळीच घटना घडल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे जान्हवीचा पारा चढला.
सुरज चव्हाणच्या या विवाह सोहळ्याला त्याच्या चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमुळे जान्हवी किल्लेकरचा राग अनावर झाला आणि ती काहीशी भडकलेली दिसली. प्रचंड गर्दी आणि गोंधळामुळे वैतागलेल्या जान्हवीने उपस्थित लोकांना हात जोडून विनंती केली.