Crime Against Women Pudhari
पुणे

Daund Crime: स्वामी चिंचोली बलात्कारप्रकरणातील 2 संशयित ताब्यात, मठात लपून बसले होते

Daund Swami Chincholi Crime: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गाडीतून फरकटत आडबाजूला नेत तिच्यावर अत्याचार केला.

पुढारी वृत्तसेवा

दौंड/भिगवण : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व लूट प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. दौंड व भिगवण पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली. समीर उर्फ लकी पठाण (वय २४, रा. माळशिरस, ता. माळशिरस), विकास नामदेव सातपुते (वय २५, रा. भिगवण, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत.

पंढरपूरला देवदर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील काही महिला व अल्पवयीन पीडिता दि. ३० जून रोजी निघाली होती. स्वामी चिंचोली येथे पहाटे चहा पिण्यासाठी थांबले असता दोघांनी कोयत्याचा धाक दाखवत व मिरचीची पुड डोळ्यांत टाकत महिलांच्या अंगावरील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले. तसेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गाडीतून फरकटत आडबाजूला नेत तिच्यावर अत्याचार केला.

या घटनेने जिल्ह्यात तसेच राज्यात खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. जवळपास दहा पथकामार्फत या घटनेचा तपास सुरू होता. याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. आमदार राहुल कुल यांनी आरोपींना अटक करून कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली होती.

घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती काही धागेदोरे मिळत नव्हते. अखेर या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले. धक्कादायक बाब म्हणजे ज्या स्वामी चिंचोली भागात ही घटना घडली होती, त्या भागात जवळच असलेल्या एका मठात हे आरोपी आश्रयास असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT