पिंपळे गुरव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नवी सांगवीतील बसस्थानकावर वादळीवार्यामुळे झाड उन्मळून पडले. त्यामुळे बसस्थानकाचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली; परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसामुळे नवी सांगवी, पिंपळे गुरव भागात झाडे कोलमडून पडण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत . बसस्थानक, मुख्य चौकात जुनी झाडे पडत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. पालिका विभागाच्या संबंधित विभागाने लक्ष देऊन अशा झाडांची छाटणी करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
हेही वाचा