महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सिंगापूरमध्ये 'दगडूशेठ' गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. Pudhari News Network
पुणे

सिंगापूरमध्ये 'दगडूशेठ' गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंगापूरमध्ये भारतीय रहिवाशांनी गणेशोत्सवाची सुरवात मोठ्या उत्साहात केली आहे. भारतीय नागरिक असलेल्या महाराष्ट्रीय नागरिकांनी महाराष्ट्र मंडळ ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सिंगापूर मध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने या मंडळाला श्री दगडूशेठ गणपतीची मूर्ती प्रदान केली आहे. याच मूर्तीची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्राणप्रतिष्ठापना केली आहे. (Dagdusheth Ganpati in Singapore)

या मंडळाचे अध्यक्ष सचिन गांजापूरकर, सचिव अजय पिंपळशेंडे, कार्याध्यक्ष अजित वैद्य यांच्या पुढाकाराने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या मंडळात विनायक शेलार, वर्षा शेलार, उपकोषाध्यक्ष अमृता कुलकर्णी, उपसचिव शीतल धारूरकर, उपाध्यक्ष अजेय कुलकर्णी यासह महाराष्ट्रीय नागरिक उत्सवाच्या काळात एकत्र येऊन विविध उपक्रम राबवित आहेत. त्याच बरोबर या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर सर्व भारतीय सण एकत्र येऊन साजरे केले जातात. तसेच विविध उपक्रमही राबवतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गांजापूरकर यांनी दिली. (Dagdusheth Ganpati in Singapore)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT