Arabian Sea cyclone | अरबी समुद्रात २६ तारखेला चक्रीवादळाची शक्यता; राज्यात आजपासून मध्यम पावसाचा अंदाज 
पुणे

Arabian Sea cyclone | अरबी समुद्रात २६ तारखेला चक्रीवादळाची शक्यता; राज्यात आजपासून मध्यम पावसाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) चक्रीवादळाची शक्यता असून ते रत्नागिरीच्या सागरात वेग घेऊन मुंबईच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शुक्रवारपासून मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचे वृत्त आहे. हे चक्रीवादळ रत्नागिरीच्या समुद्रात २६ ऑक्टोबर रोजी तयार होणार असून त्याचा रोख मुंबईच्या दिशेने असल्याचा प्राथमिक अंदाज शास्त्रज्ञांनी दिला आहे.

चक्रीवादळाचा अंदाज सप्टेंबरमध्येच शास्त्रज्ञांनी वर्तवला

यंदा परतीचा मान्सून माघारी फिरताच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सलग तीन चक्रीवादळे निर्माण होतील, असा अंदाज सप्टेंबरमध्येच शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. त्याप्रमाणे पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात रत्नागिरीजवळ २६ रोजी तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ ते २१ ऑक्टोबर दरम्यान राज्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT