पुणे

Cyber Crime : क्राईम ब्रांचच्या नावाने धमकी; 10 लाख 70 हजार उकळले

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तुमच्या नावाने मनी लाँर्डिंग झाले असल्याचे सांगत कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला फोन करून मुंबई क्राईम ब्रांच येथील अधिकारी असल्याचे सांगत धमकाविण्यात आले. हे प्रकरण निल करण्यासाठी सायबर चोरट्याने तब्बल 10 लाख 70 हजार उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. आता याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने ऑनलाइन पैसे वर्ग करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. याबाबत एका 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

तर दुसर्‍या प्रकरणात मुंबईतील मनी लाँर्डिंगची केस मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून, त्यामध्ये तुमच्या नावाने वॉरंट निघाल्याचे सांगून एका 64 वर्षीय ज्येष्ठ महिलेला फोन करण्यात आला. तिला पोलिस बोलत असल्याचे सांगून उच्च न्यायालयाला तुमची खाती तपासायची आहेत, त्याकरिता फिर्यादीच्या खात्यातील 9 लाख 75 हजार रुपये मोबाईलधारकाने विविध खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र त्या मोबाईलधारकाराला रक्कम परत पाठविण्यास सांगूनही त्याने पाठवली नाही. जेव्हा आपली फसवणूक झाल्याचा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर तिने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT