पुणे

cyber crime: ऑनलाईन फसवणूक, सायबर चोरांकडून ९ लाखांचा गंडा

रणजित गायकवाड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : cyber crime : सायबर चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून शहरात तीन सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी 9 लाख 15 हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या घटनेत गणेश पेठेत राहणार्‍या एका तरूणाला आरोपींनी डिजिटल मार्केटिंग सुपर लाईक अ‍ॅपद्वारे त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपींच्या सांगण्यानुसार तरूणाने 3 लाख 42 रूपये भरले. दरम्यान, फिर्यादी यांना परताव्या पोटी ऑनलाईन 39 हजार 262 रूपये त्यांच्या बँकेच्या खात्यात पाठविण्यात आले. मात्र उर्वरीत 3 लाख 2 हजार 738 रूपये त्यांना परताव्यास परत दिलेच नाही. नंतर आरोपींनी त्यांच्या कंपनीची वेबसाईट बंद केली. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार फेब्रवारी 2021 मध्ये घडला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लांडगे करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत ओएलएक्स अ‍ॅपवर दिलेल्या जाहीराती मधील लॅपटॉप करेदी करण्याच्या बहाण्याने फिर्यादी 30 वर्षीय तरूणधाला 18 हजार रूपये पाठविण्यास भाग पाडल्याचा व कोणताही लॅपटॉपही न दिल्याच प्रकार समोर आला आहे. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधीत अनोळखी व्यक्ती विरोधात तरूणाने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 15 जुलै ते 16 जुलै 2021 दरम्यान घडला.

तिसर्‍या घटेनत बिबवेवाडी येथे 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट रोजीपर्यंत एका 45 वर्षीय महिलेला तिच्या मोबाईलवर मेसेज आला ( cyber crime ) . त्यामध्ये महिलेला तुमचे केवायसी 24 तासामध्ये अपडेट करून घ्या नाहीतर तुमचे अकाऊंट सस्पेंड होईल असे सांगण्यात आले. मोबाईलधारक व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून महिलेच्या वडीलांचा मोबाईल नंबर घेवुन, त्यावर फोन केला. महिलेच्या वडीलांकडून बँकेच्या खात्याची सर्व माहिती व ओटीपी नंबर घेऊन महिला व तिच्या वडीलांच्या जॉईंट अकाऊंटवरून तब्बल 5 लाख 94 हजार 500 रूपये ऑनलाईन काढून घेत त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात ऑनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे निरीक्षक अनिता हिवरकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT