पुणे

Crime News : दुचाकीस्वारास मारहाण करुन लूटणाऱ्या तिघांना अटक

Laxman Dhenge

पुणे : दुचाकीस्वारास मारहाण करुन लूटणाऱ्या तिघांना खडक पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि एक सोन्याची साखळी असा एक लाख ३३ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. मयुर किरण भोसले ( वय १९), सुदर्शन विजय मोठे ( वय २४, दोघेही रा. दांडेकर पुल) आणि अभिषेक दशरथ वाघमारे ऊर्फ मम्या ( २२, रा.वडगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तीघेही सराईत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नूसार, शुक्रवारी बोंबील बाजार येथे चौघांनी एकाची दुचाकी अडवून त्याला मारहाण केली. यांतर त्याची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून पळ काढला.

याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान तपास पथकाचे अधिकारी प्रल्हाद डोंगळे व अमंलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे हे गस्त घालत होते. तेव्हा अंमलदार आशिष चव्हाण व प्रमोद भोसले यांना खबर मिळाली की, जबरी चोरी करणारे घोरपडे पेठ येथील मंत्रा हॉटेलच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत आले आहेत. तेथे पथक गेले असता अभिषेकला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून मयुर आणि सुदर्शन यांना सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले गेले.

त्यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेली सोन्याची साखळी आणि गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार , अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक संपतराव राउत , सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे , उपनिरीक्षक अजीज बेग , पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रशांत बडदे, लखन ढावरे, रफिक नदाफ, सागर कुडले, तुळशीराम टेभुर्णे, महेश जाधव, चंद्रशेखर खरात, प्रविण गावीत, सुहास साळुंके यांचे पथकाने केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT