पुणे

Crime News : अखेर घरफोडी करणारे दोघे जेरबंद

Laxman Dhenge

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घरफोडी केलेले दोन आरोपी गजाआड केले. रेहान रमजान लदाफ (वय 20, रा. नुरानी मस्जीदजवळ लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) आणि झैद नईम शेख (वय 21, रा. आर. के. चौक लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-अहमदनगर महामार्गालगत असलेल्या हॉटेल अमर इनच्या काउंटरमधून रात्रीच्या वेळी दोन मोबाईल व 30 हजार रुपये चोरट्यांनी पळविले होते. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे अंमलदार करीत होते.

त्यांनी घटनास्थळ व महामार्गावरी 150 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, तसेच तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून रेहान लदाफ आणि झैद शेख यांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी अशा प्रकारचे रांजणगाव पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडीचे तीन गुन्हे व मंचर पोलिस ठाणे हद्दीतील 1 गुन्हा केला असल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वरील गुन्ह्यांतील चोरीस गेलेले 2 मोबाईल फोन व 9 हजार रुपये रोख रक्कम, तसेच गुन्हा करताना वापरलेली 40 हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण 70 हजार 528 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस जवान उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार नागरगोजे यांनी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT