तळेगाव ढमढेरे : येथील प्रथम सोसायटीतील बंद सदनिका फोडून चोरट्यांनी तब्बल बेचाळीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्रथम सोसायटीत ब्रिदगीत वैदांडे या राहण्यास असून त्यांचा मुलगा व सून नोकरीनिमित्ताने दुबईत वास्तव्यास आहेत. वैदांडे आजारी पडल्याने त्या घरातील कपाटात सोन्याचे दागिने ठेवून घराला कुलूप लावून मुलाकडे दुबईला गेल्या होत्या.
त्यांच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसल्याने शेजारील नागरिकांनी त्यांना फोन करून माहिती दिली. त्यांनतर शनिवारी (दि. 3) त्या दुबईहून घरी आल्या. त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील तब्बल बेचाळीस तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. शिक्रापूर ठाण्यात याप्रकरणी ब्रिदगीत सिमोन वैदांडे यांनी फिर्याद दिली आहे.
हेही वाचा