पुणे: पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याने शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचा आरोप करीत कौटुंबिक न्यायालयाची पायरी चढणार्या पत्नीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नीने दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश न्यायाधीश गणेश घुले यांनी दिला आहे.
पतीच्या लैंगिकतेबाबत पत्नीने न्यायालयासमोर नमूद केलेल्या काही गोष्टी परस्परविरोधी असल्याने तिच्या दाव्यावर संशय निर्माण होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच, केवळ आरोप करणे आणि ते कायदेशीररित्या सिद्ध करणे या दोन भिन्न बाबी असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
माधव आणि माधवी (नावे बदललेली आहेत) यांचा विवाह 2021 मध्ये झाला होता. मात्र, काही काळानंतर माधवी या पतीचे घर सोडून निघून गेल्या. त्यामुळे माधव यांनी हिंदू विवाह अधिनियमच्या अंतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नीने कोणत्याही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून, तिला परत नांदायला येण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.
पतीच्या याचिकेला उत्तर देताना माधवी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. लग्नानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, असेही तिने आपल्या लेखी जबाबात म्हटले. तसेच पत्नीने दुसर्या न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्याचेही म्हटले.
याप्रकरणात पतीच्या वतीने अॅड. मयुर साळुंके व अॅड. अजिंक्य साळुंके यांनी बाजू मांडली. पतीने आपल्या याचिकेत आणि पुराव्यात हे सर्व आरोप फेटाळून लावले. आपण शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असून, मधुचंद्रावेळी आणि त्यानंतरही त्यांच्यात आनंदी शारीरिक संबंध होते, असे पतीने ठामपणे सांगितले.
अॅड. साळुंके यांना अॅड. अमोल खोब्रागडे व अॅड. पल्लवी साळुंके यांनी सहकार्य केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे तपासले. पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला असला तरीही कोणताही वैद्यकीय पुरावा दिला नाही.
पत्नीच्या म्हणण्यात विसंगती आहे. लैगिंकतेबाबत पत्नीने म्हटलेल्या दोन गोष्टी परस्परविरोधी असल्याने तिच्या दाव्यावर संशय निर्माण होतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह हा एक पवित्र संस्कार आहे. किरकोळ कारणे किंवा सिद्ध न झालेले आरोप यावरून ही महत्त्वपूर्ण संस्था मोडता कामा नये.
पती-पत्नीमधील नातेसंबंध टिकवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणे अपेक्षित आहे. प्रत्येक लहान-सहान गोष्टीसाठी किंवा सिद्ध न होणार्या आरोपांसाठी न्यायालयीन प्रक्रियेचा वापर टाळावा.- अॅड. अजिंक्य साळुंके, पतीचे वकी