Kondhari Nandgaon sarpanch join NCP
भोर: भोर- महाड रस्त्यावरील कोंढरीचे सरपंच अजित पारठे व नांदगाव येथील सरपंच भाग्यश्री चर्हाटे यांच्यासह गावातील कार्यकत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
या वेळी आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर तालुका अध्यक्ष संतोष घोरपडे, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश वाढल्याचे बोलले जात आहे.
भोर तालुक्यातील नांदगावच्या सरपंच भाग्यश्री गणेश चर्हाटे, दिलीप कुडले, प्रकाश कुडले, मोहन मांढरे, किसन कुडले, शंकर कुडले, पंढरीनाथ चर्हाटे, विजय चर्हाटे, मारुती मारणे, दिनकर खोपडे, अरुण चर्हाटे, शशिकांत खुटवड, अशोक भातुसे, बंटी चर्हाटे, रावसाहेब चर्हाटे, प्रशांत जगताप, मिलिंद जगताप, संतोष कुडले, भरत कुडले, संभाजी कुडले, सुनील कुडले यांनी प्रवेश केला.
कोंढरी गावचे सरपंच अजित पारठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यामुळे शिंद भोलावडे गटात राष्ट्रवादीला बळ मिळणार आहे.