पर्यटन स्थळे गजबजल्याने मक्याला भाव Pudhari
पुणे

Corn Price: पर्यटन स्थळे गजबजल्याने मक्याला भाव

घाऊक बाजारात क्विंटलमागे तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ

पुढारी वृत्तसेवा

Corn price rise due to tourism

पुणे: रिमझिम पावसात पर्यटनाचा आनंद घेत मक्याचे कणीस खाण्याचा आनंद काही औरच आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र पाऊस पडत असल्याने पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. या ठिकाणी भाजलेल्या मक्यांच्या कणसांसह उकडलेल्या दाण्यांना मागणी होत आहे.

परिणामी गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कणसाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी येत असल्याने कणसाच्या किलोच्या दरात क्विंटलमागे 300 ते 500 रुपयांनी वाढ झाली आहे. (Latest Pune News)

मागील काही दिवसांत शहरात मोठ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. त्याच्या अधून-मधून सरी कोसळत आहेत. मात्र, शहरालगतच्या घाटमाथ्यांवर पावसाच्या हलक्या सरींची संततधार सुरू आहे. त्यामुळे, पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडत आहेत.

शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळी पर्यटकांची संख्या वाढली असल्याने मक्याच्या कणसाला मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातही रविवार वगळता इतर दिवशी 800 ते 1000 गोणी आवक होत आहे.

रविवारी 1500 गोणींची आवक होत आहे. ही आवक बारामती, खेड, मंचर, नारायणगाव, नाशिक, अहिल्यानगर येथून होत आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोला 15 ते 20 रुपये दर मिळत आहे. चांगल्या प्रतीचा माल असेल, तर त्यास 22 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मागील वर्षी प्रतिकिलोला 12 ते 15 रुपये दर मिळाला होता. जूनपासून मक्याच्या कणसाची आवक सुरू झाली आहे. ही आवक हिवाळ्यापर्यंत कायम असणार असल्याचेही सुपेकर यांनी नमूद केले.

निम्म्याहून अधिक मक्याची पर्यटनस्थळी विक्री

बाजारात खरेदीस येत असलेला ग्राहक हे पर्यटन स्थळांवरील विक्रेते आहेत. त्यामुळे, दाखल होत असलेल्या मालापैकी 70 ते 80 टक्के माल पर्यटनस्थळी जात आहे. तर 10 ते 20 टक्के माल हा हॉटेल तसेच प्रक्रिया उद्योगाकडे जात आहे. शहर व उपनगरातील उद्याने, मंदिरे तसेच विविध रस्त्यांवर भाजलेल्या कणसाचा दर 40 रुपये आहे?तर जिल्ह्यातील पर्यटनस्थळी एका कणसाचा दर 50 रुपयांवर पोहचला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मक्याच्या कणसाला अधिक दर मिळत आहे. पावसात वाढ झाल्यानंतर दरात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. मागणी अशीच राहिल्यास घाऊक बाजारातील किलोचा दर 22 ते 25 रुपयापर्यंत जाऊ शकतो. बाजारात मिळत असलेल्या दरावर शेतकरी समाधानी आहेत.
- पांडुरंग सुपेकर, व्यापारी, मार्केटयार्ड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT