Accident Arrest Pudhari
पुणे

Container Accident Arrest: ३ दिवसांनी जेरबंद अपघातस्थळावरून पळालेला कंटेनर चालक

कुरकुंभ हद्दीतील भीषण अपघातात वडील-मुलाचा मृत्यू; पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चालकाला पकडले

पुढारी वृत्तसेवा

कुरकुंभ: कुरकुंभ (ता. दौंड) हद्दीत कंटेनरने दुचाकीला समोरून धडक दिल्याने अपघात झाला होता. या भीषण अपघात दुचाकीवरील वडील व लहान मुलाचा मृत्यु झाला होता. यात तीन दिवसांपासून फरार असलेल्या चालकाला कंटेनरसह गुरुवार (दि.६) ताब्यात घेतले. श्याम इंवलीश दहिफळे (वय २६, रा. किनगाव, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर) असे ताब्यात घेतलेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे.  (Latest Pune News)

याबाबत अधिक माहितीनुसार खंडु नारायण बनसुडे व त्यांचा सहा वर्षांचा मुलगा रूद्र हे दोघे दुचाकीवरून (एमएच ४२ एटी ९२२) हडपसर (पुणे) येथून घरी पळसदेव (ता.इंदापूर)कडे जाण्यासाठी निघाले होते. रविवारी (दि.२) सायंकाळी कुरकुंभ हद्दीतील उड्डाणपुलावरून चुकीच्या बाजूने भरधाव वेगात कंटेनरचालकाने खंडु बनसुडे यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली होती. यामध्ये खंडू बनसुडे व रूद्र यांचा मृत्यु झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे पळसदेव व कुरकुंभमध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. कंटेनरचालकाच्या चुकीमुळे दोन निष्पाप जीवाचा जीव गेल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात होता. फरार झालेल्या कंटेनरचालक तातडीने अटक करण्याची मागणी होत होती. पोलिसांसाठी हे आव्हान होते.

दरम्यान पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवत साधारण १०० सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रीकरण तपासले, तसेच इतर माहितीच्या आधारावर फरार कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे यांनी काम पाहिले असून त्यांना शंकर वाघमारे, किरण पांढरे, संजय कोठावळे, अकुंश दळवी, इक्बाल पठाण, संजय नगरे, यांची मदत झाली. पोलीस मित्र आबा शितोळे, सुरज साळुंके, योगेश कांबळे, सुनिल भंडलकर, अक्षय गायकवाड यांचे देखील या तपासात सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT