पुणे: वनविभागाच्या वतीने बुध्दपौर्णिमेला प्राणी गणना होते. मात्र यंदा सर्वंत्र पावसाळी वातावरण तयार झाले असून आकाश ढगांनी व्यापले आहे.त्यामुळे प्राणी गणनेत यंदा मोठा अडसर निर्माण झाला आहे. तरीही वनविभागाच्या वतीने विविध ठिकाणी सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व रेंजमिळून सुमारे 10 हजार पेक्षा जास्त मचाण जंगलात बांधले आहेत.हे सर्व मचाण पंधरा दिवस आधीच आरक्षित झाले आहेत. दरवर्षी वैशाख पौर्णिमा अर्थात बुध्द पौर्णिमेला जंगालतील वन्यजीवांची गणना लोकांच्या निरिक्षांद्वारे केली जाते कारण या दिवशी रात्रीचा कालावधी मोठा आणि चंद्रबिंग खूप मोठे असते. (Latest Pune News)
दिवसभर उन्हामुळे तहानलेले वन्यजीव रात्री पाणवठे शोधत पाणी पिण्यासाठी येतात, त्यामुळे जंगलातील पाणवठ्यांजवळ त्यांचे दर्शन होते.सामान्य नागरिकांना वन्यजीव अगदी जवळून बघायला मिळतात.त्यामुळे या दिवशी जंगलात किती प्रकारचे प्राणी आहेत.याची गणना होते.