पुणे

नेमणुकांचा घोळ : केंद्रप्रमुखपदी कनिष्ठ अधिकारी तर दुय्यम पदावर आयुक्त

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवरील नेमणुका या सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. कारण मतदान केंद्र प्रमुखपदी कनिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली वरिष्ठ स्तरावरच्या अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. पुण्यातील एका आयुक्तांची नेमणूकही अशाच पद्धतीने सहायक मतदान केंद्र प्रमुखपदी झाल्यावर निवडणूक यंत्रणेच्या ही बाब लक्षात आणून दिली गेली आणि त्यांची चुकीच्या झालेली नेमणूक रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुण्यात सहकार, साखर, कृषी, पणन, दुग्ध विभाग आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अधिकार्‍यांची वर्णी लोकसभा निवडणूक मतदानादिवशी लावण्यात आलेली आहे.

उपनिबंधक झाले सहायक मतदान केंद्रप्रमुख

सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार्‍या उपनिबंधकांना सहायक मतदान केंद्रप्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कार्यालयास ज्या कार्यालयांनी मतदानासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची यादी कळविली नाही, त्या कार्यालयातील अधिकार्‍यांची ट्रेझरीमधील पगाराच्या यादीनुसार जसे नाव येईल, तशा नेमणुका करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नाव न कळविणे हीसुद्धा संबंधित कार्यालयाची चूक आहे. त्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर निवडणुकीत जबाबदारी बदलून देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT