Maharashtra Cold Wave Alert
पुणे: उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रीय झाल्याने तो भाग गारठण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी ४८ तासांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारताचे कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस वर आहे. त्यात वेगाने घट होत आहे. किमान तापमानात २ ते ४ अंशाने घट होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पाऊस ५ नोव्हेंबर पासून पूर्ण थांबल्यामुळे आगामी ४८ ते ७२ तासांत थंडीचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण व सायंकाळनंतर हवेत गारवा असे वातावरण गुरुवारी पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत वातावरणात सौम्य बदल झाला असून कमाल तापमान 28.6 अंश तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळी हलका गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर थोडी उष्णता होती. रात्री पुन्हा हवेत गारवा निर्माण झाला होता.