Cockroach Janta Party Pudhari
पुणे

Cockroach Janta Party Fraud: कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक; बनावट लिंकपासून सावध राहा!

सोशल मीडियावर बनावट मेंबरशिप लिंकचा सापळा; नागरिकांना सायबर तज्ज्ञांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: देशभरात कॉकरोच जनता पार्टीने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. युवावर्गासह सर्वांना आकर्षित केलेल्या या पार्टीच्या नावाने बनावट लिंक सुरू करून ऑनलाईन फसवणूक सुरू असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स आणि टेलिग्राम गटांच्या माध्यमातून नागरिकांना या पार्टीचे विशेष सदस्य बनण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे अशा बनावट लिंकपासून सावध राहण्याचा इशारा ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी नागरिकांना दिला आहे.

डॉ. शिकारपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट लिंकद्वारे फसवणुकीची पद्धत अत्यंत धोकादायक आणि नियोजनबद्ध आहे. नागरिकांना सोशल मीडियावर ‌‘जॉईन एक्सक्लुसिव्ह कॉक्रोच पार्टी मेंबरशिप‌’ असा संदेश पाठवला जातो.

त्यामध्ये एक लिंक दिलेली असते. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर 499 रुपये भरून प्रीमियम सदस्य व्हा किंवा व्हीआयपी नेटवर्कमध्ये सामील व्हा, अशी आकर्षक आश्वासने दिली जातात. लिंक ओपन करताच बँकेतील पैसा गायब होतो. एका प्रकरणात लिमिटेड मेंबरशिप ऑफर या नावाखाली लिंक पाठवण्यात आली.

लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील भरल्यानंतर काही मिनिटांतच खात्यातून हजारो रुपये गायब झाल्याची तक्रार नोंदवली आहे. अनोळखी सदस्यत्व लिंक, क्यूआर कोड किंवा जलद पैसा कमवा संदेश हे बहुतेक वेळा डिजिटल सापळे असतात. कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आणि अधिकृत स्रोताशिवाय आर्थिक व्यवहार न करणे हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT