Civil Defence Mock Drill in Pune
पुणे : पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल केले जाणार आहे. पुणे शहरात विधान भवन, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव येथील नगरपरिषद येथे दुपारी चार वाजता संरक्षण आणि पोलीस विभागासह इतर विभागातील १० ते १५ कर्मचारी आणि १०० ते १५० महाविद्यालयिन विद्यार्थी सहभाग होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
केंद्र सरकारच्या ७ मे रोजी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत. त्यानुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बोलत होते.
डुडी म्हणाले, युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मदत आणि मार्गदर्शन पोहोचविण्यासाठी खबरदारी म्हणून ही मॉक ड्रिल आयोजित केली आहे. एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर कशा पद्धतीने कार्यवाही करायची हे पाहणार आहे. अग्निशमन दल आणि एडीआरएफचा सहभाग असणार आहे.
शहरात ७५ ठिकाणी सायरनची व्यवस्था असणार आहे. बुधवारी हे वाजणार नाही. शासनाच्या निर्देशाप्रमाणे पहिला मॉक ड्रिल घेणार आहे
तसेच वॉर रूम सुद्धा तयार करण्यात येणार आहे. त्यात सर्व विभागांचा समन्वय असणार आहे.
पुणे नाही तर मुंबईत एका ठिकाणी ब्लॅक आउट असणार आहे. देशभरात २४४ जिल्ह्यात एकाच वेळी ही मॉक ड्रिल होणार. सायरन वाजल्यानंतर काय काय करायचे हे सगळं सांगितलं जाणार आहे.