कोंढवा: काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने गुडलक चौकात तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
काश्मीर खोर्यातील पहेलगाम येथे देशभरातून पर्यटनासाठी आलेल्या अनेक निष्पाप लोकांना धर्म विचारून निर्दयी दहशतवाद्यांनी बेछूटपणे गोळीबार केला. यात 28 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया, राज्य सचिव आशिष साबळे पाटील, शहराध्यक्ष महेश भोईबार, धनंजय दळवी, उपशहराध्यक्ष परीक्षेत शिरोळे, प्रवीण कदम, संतोष वरे, नीलेश जोरी, केतन डोंगरे, मंदार ठोंबरे, कृणाल पायगुडे, महेश डोके, मयूर शेवाळे, कृष्णा ताजवेकर, अभी पिसे, अक्षय पायगुडे, सुमेध वडमारे, गणेश बिराजदार, शिवम सट्टे, ओमकार पवार, शुभम टिंगरे, शुभम टिंगरे, विजय कामठे आदींसह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाकिस्तानच्या ध्वजाची होळी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सकल हिंदू समाज आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकात या हल्ल्याचा निषेध करीत पाकिस्तानच्या ध्वजाची होळी केली.
हा हल्ला करणार्या दहशतवाद्यांचा लवकरात लवकर खात्मा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी दिलीप मेहता, गणेश शेरला, संदीप भंडारी, किशोर चव्हाण, विश्वनाथ हेडगे, नाना क्षीरसागर, श्वेता होनराव, पूजा मोहोळ, प्रवीण चोरबेले, राजश्री शिळीमकर आदी उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांकडून मृतांना श्रद्धांजली
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना औंध मशीद ट्रस्टच्या वतीने शुक्रवारच्या नमाजपठण प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून या हल्ल्याचा निषेध केला. देशावरील हल्ला कोणीही सहन करणार नाही. तसेच, देश एकजूट असल्याचा संदेश या वेळी देण्यात आला. दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. अल्लाउद्दीन पठाण, फैयास खान, हमीद सय्यद, मैनुद्दिन शेख, इस्माईल शेख, इरफान शेख, असलम शेख आदींसह मुस्लिम बांधव या वेळी उपस्थित होते.