Sex Ratio 
पुणे

बाल लिंग गुणोत्तर प्रमाणात पुणे जिल्ह्यातील 575 गावे रेडझोनमध्ये

अमृता चौगुले

समीर सय्यद

पुणे : जिल्ह्यात 0 ते 6 वयोगटातील मुलांसाठी लिंग गुणोत्तर प्रत्येक एक हजार मुलांमागे 941 मुली आहेत. सन 2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे 883 मुली असल्याचे नोंद आहे. जैविक मानकांनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे 940-950 मुली असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील 575 गावे रेडझोनमध्ये असून, येथे एक हजार मुलांमागे 912 मुली आहेत.

बाल आरोग्य तपासणीत बाब उघड

पुणे जिल्हा परिषदेने बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात मुलांची नावे आणि आरोग्यासंदर्भात नोंदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मुलाची समुदाय आरोग्य अधिकार्‍यांनी आरोग्य तपासणी केली आहे. बालकाचे नाव आणि 36 अत्यावश्यक बालवैज्ञानिक पॅरामीटर्सवर आरोग्य विषयक माहिती संकलित करण्यात आली आहे. सहा प्रकारच्या तज्ज्ञांव्यतिरिक्त, सामुदायिक आरोग्य अधिकार्‍यांच्या रेफरल व्यतिरिक्त. स्क्रीनिंगच्या पहिल्या फेरीत 3 लाख 28 हजार मुलांची नोंद झाली आहे. त्यातील तीन लाख 11 हजार मुलांची तपासणी करण्यात आली.

संकलित झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यामध्ये  बाल लिंग गुणोत्तर पाहिल्यास 31 जानेवारी 2022 पर्यंत 0 ते 6 वर्षे वयोगटातील 2 लाख 85 हजार 174 मुले आहेत. यामध्ये अंगणवाडी, खासगी शाळा, घरातील, शाळा इत्यादी मुलांचा समावेश आहे. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 21 ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्हा परिषद अजूनही आरोग्य सेवा पुरवत आहे. या गावांतील सर्व मुलांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, परंतु बाल लिंग गुणोत्तर केवळ ग्रामीण भागातील मुलांचीच नोंदवले आहे.

गावांचे तीन श्रेणींमध्ये विभाजन

आरोग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यातील गावे गावे 3 श्रेणींमध्ये विभागण्यात आली आहेत. त्यात गावांचे बाल लिंग गुणोत्तर 949 किंवा त्याहून अधिक आहे; अशी 686 गावे ग्रीनमध्ये नोंदवली आहे. 912 ते 948 बाल लिंग गुणोत्तर अशी 111 गावे आरेंज आणि 912 पेक्षा कमी बाल लिंग गुणोत्तर असलेली 575 गावे रेडझोनमध्ये विभागण्यात आली आहेत.

पोलीस पाटलांना दिले जाणार आदेश

बाल आरोग्य तपासणीतील आरोग्य नोंदी तयार करत आहोत. त्यामुळे बालमृत्यू कमी होण्यास मदत होईल. जन्मानंतर 30 दिवसांच्या आत डिजिटल जन्म प्रमाणपत्रे आणि जन्मानंतर 4 दिवसांच्या आत आधार कार्ड जारी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस विभाग सक्रिय पावले उचलत आहे. या संदर्भात बेकायदेशीर कृतींबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आम्ही लवकरच पोलीस पाटलांना आदेश दिले जाणार आहेत.

भारत आणि महाराष्ट्र सरकारचे विविध उपक्रम आणि कायदे प्रभावीपणे राबविले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बाल लिंग गुणोत्तर 2011 मधील 883 वरून 2022 मध्ये 941 पर्यंत वाढविण्यात मदत झाली आहे. बाल लिंग गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी आणि स्त्री भ्रूण हत्या किंवा बालिका हत्येची कोणतीही प्रथा नाहीशी करण्यासाठी, आम्ही आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माता आणि कुटुंबांचे समुपदेशन करत आहोत.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT