Chicken Thali Pudhari
पुणे

Chicken Mutton Price Hike: : गणेशोत्सवानंतर चिकन-मटणाचे दर कडाडले; चिकन २६०, मटण ८४० रुपये किलो

मागणी वाढली, पुरवठा घटला; दुष्काळ आणि खाद्याच्या वाढत्या खर्चामुळे पोल्ट्री व्यवसायावरही परिणाम

पुढारी वृत्तसेवा

मंचर: गणेशोत्सवानंतर चिकन आणि मटणच्या बाजारभावात वाढ झाली आहे. त्याचा फायदा पोल्ट्रीचालक शेतकरी आणि मेंढपाळांना होत आहे. ग्राहकांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत असल्याने बाजारभाव कडाडल्याचे सांगण्यात आले.

गणेशोत्सवानंतर चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. बॉयलर कोंबडीचा उचल दर सध्या १३५ रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. दहा दिवसांपूर्वी सुमारे २०० रुपये किलो दराने मिळणारे चिकन सध्या २४० ते २६० रुपये किलोने विकले जात आहे.

कळंब येथील विक्रेते इसाक शेख, मंचर येथील बाबा चिकनचे साहील इनामदार, घोडेगाव येथील घाऊक कोंबडी विक्रेते जावेद मिस्त्री, फिरोज मिस्त्री आणि इम्रान मोमीन यांनी ही माहिती दिली. मटणाच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या मटनाचा दर ८०० ते ८४० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. मंचर येथील विक्रेते शारूफ इनामदार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, अंड्यांच्या दरातही वाढ झाली आहे. अंड्यांचा दर शेकडा ६०० रुपयांपर्यंत गेला आहे. मका व सोयाबीनच्या दरात वाढ होत असल्याने पोल्ट्री खाद्याचा खर्च वाढल्याचे गोविंद थोरात, निकेतन दैने आणि माया शंकर थोरात यांनी सांगितले.

दुष्काळी स्थितीमुळे पाणीटंचाईचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. बहुतांश पोल्ट्री फार्म बंद अवस्थेत आहेत. त्यातच खाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पोल्ट्री उत्पादक कंपन्यांनी कोंबड्यांच्या उचल दरात मोठी वाढ केली आहे.
शफीभाई मोमीन, शिनोली
पाऊस कमी झाल्यामुळे वाढलेल्या उष्णतेने कोंबड्या मृत्युमुखी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस नसल्यामुळे अनेक पोल्ट्रीचालकांना पाणीटंचाईचाही फटका बसत आहे. त्यामुळे काही पोल्ट्री बंद आहे. त्यामुळे भविष्यात आणखी दर वाढू शकतात.
प्रमोद हिंगे पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT