Indapur Construction Department
इंदापूर : इंदापूरमधील विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्कारावेळी अचानक वीजपुरवठा सातत्याने खंडित होत होता यामुळे उपस्थित सर्वच थोडेसे गोंधळले. मात्र सत्कार स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत दहा सेकंद येते, १० सेकंद जाते असे म्हणत एकतर ती वीज सुरू ठेवा किंवा बंद करून टाका मला काही अडचण नाही असे म्हणत संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसले.
गुरुवारी (दि.२३) संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माढा तालुक्यातील अरण या ठिकाणी जात असताना इंदापुरातील कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी भुजबळ शासकीय विश्रामगृहात थांबले होते.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते त्यांचा सत्कार करत असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने भुजबळ चांगले संतापले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सुनावले.
ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे येणार असल्याचे माहित असून ही संबंधित विभागाकडून कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती. वीज पुरवठा खंडित होत असल्याने जर कोणता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर त्याच जबाबदार कोण घेणार होते हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे.ॲड. सचिन राऊत