Chetan Phale NCP News
पौड: मुळशी तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये कोळवण खोऱ्यातील नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेतन फाले यांचादेखील समावेश आहे.
चेतन फाले यांच्या मातोश्री मंजुळा सोपान फाले या नांदगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. तसेच ते स्व. पै. अमितदादा फाले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सतत निरनिराळे उपक्रम राबवत असतात. चेतन फाले यांच्या रूपाने कोळवण खोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगला युवा कार्यकर्ता मिळाला आहे.(Latest Pune News)
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, दूध संघाचे संचालक कालिदास गोपालघरे, युवक अध्यक्ष सुखदेव मांडेकर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षाच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी सोडवणे व आ. शंकर मांडेकर यांच्या माध्यमातून विकासकामे करण्याचा प्रयत्न राहील, असे चेतन फाले यांनी सांगितले.