पुणे

Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील चौघे तडीपार

अमृता चौगुले

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव, नवरात्री हे सण शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी रेकाॅर्डवरील चार गुन्हेगारांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे दाखल केला होता. त्याला मंजूरी मिळाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली. हर्षद उर्फ हर्षा राजू बागवान. पिन्या उर्फ अमर सुनील सोनवणे, अमोल राजू कांबळे ( तिघे रा. आमराई, बारामती) व ऋतिक उर्फ विधूर मनोज लालगिबे (रा. दुर्गा टाॅकीजजवळ, बारामती) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

त्यांना बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर, हवेली, पुणे शहर, पिंपरी चिंचवड व सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या चौघांविरोधात मारामारी, चोरी, खंडणी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याने जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्याकडे दाखल केला होता. तो मंजूर झाला आहे. शहरातील रेकाॅर्डवरील गुन्हेगार तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या उपद्रवींची पोलिस ठाण्याकडून यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या विरोधात मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अशा लोकांनी नावे पोलिसांना द्यावीत असे आवाहन तायडे यांनी केले आहे.

 हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT