पुणे: मुलीची छेड काढल्याच्या कारणातून तरुणासह त्याच्या मित्राला मारहाण केल्याप्रकरणी 12 जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी तक्रारदारावर सिमेंटच्या ब्लॉकने हल्ला केल्याची घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात मराठी शाळेसमोर घडली. याप्रकरणी मनीष राजू पाटोळे (वय 22, रा. शिवशाही चौक, खुळेवाडी, चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार किरण शेडगे, राहुल शेडगे, बाहा शेडगे, नीलेश शेलार, माऊली शेलार, ऋषिकेश शेलार, लोकेश शेलार, विक्रांत खाडे, आदेश खडसिंग यांच्यासह आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 17 डिसेंबरला साडेअकराच्या सुमारास मुलीच्या छेडछाडीच्या कारणावरून आरोपींनी मनीष पाटोळे आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सिमेंटच्या ब्लॉकचा वापर केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहेत.