Pune Nashik highway traffic update 
पुणे

Pune Nashik highway traffic update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Pune Nashik highway traffic update

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कामगार, प्रवासी आणि रुग्णवाहिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळच्या शिफ्टच्या वेळी वाहनांची संख्या अचानक वाढल्याने महामार्गावरील वाहतूक अत्यंत संथ झाली. त्यामुळे अनेक वाहनचालकांना तासन्‌तास या कोंडीत अडकून राहावे लागले. रुग्णवाहिकांनाही या वाहतूककोंडीतून मार्ग काढताना तीव्र अडचणी येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीत दररोज लाखो कामगारांची ये-जा असते. त्यातच वाढती वाहनसंख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यांमुळे येथे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. "चाकणची ही भीषण वाहतूककोंडी अखेर कधी सुटणार?" असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे विभागातील १७३ विशेष बसचे बुकिंग फुल्ल

आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक सुखकर करण्यासाठी एसटीच्या पुणे विभागाने कंबर कसली आहे. यंदा गणेशोत्सवासाठी पुणे विभागातून सोडण्यात येणाऱ्या तब्बल १७३ एसटीबसचे बुकिंग पूर्ण (फुल्ल) झाले आहे. यामध्ये १२० गाड्यांचे ग्रुप बुकिंग, तर ५३ गाड्यांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे.

होळी सणाप्रमाणेच दरवर्षी गणेशोत्सवासाठी पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. प्रवाशांची हीच अतिरिक्त सोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून दरवर्षी विशेष बस सोडल्या जातात. गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी पुणे विभागातून १७० जादा गाड्या धावल्या होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT