Vegetables Pudhari
पुणे

Chakan Market Yard Rates: चाकण बाजारात भाजीपाल्याचे दर गडगडले; कांदा मात्र स्थिर

मिरची, टोमॅटो, लसूण स्वस्त; पालेभाज्यांची मोठी आवक, 4.70 कोटींची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, टोमॅटो व लसणाचे भाव गडगडले. कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नाही. चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. राजगुरुनगर येथील बाजारात दोडका, काकडी, वांगी, भेंडी, शेवगा व वाटाण्याची प्रचंड आवक झाली. एकूण उलाढाल 4 कोटी 70 लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 8 हजार क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 4 हजार क्विंटलने घटली; मात्र भाव स्थिर राहिले. कांद्याचा कामाल भाव 1,400 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1,400 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावही 1,200 रुपयांवर स्थिरावले. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भावही 12 हजार रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 310 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 5 हजार रुपयांपासून 7 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे:

कांदा : एकूण आवक 8,000 क्विंटल, भाव क्रमांक 1 - 1,400 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 3 - 800 रुपये. बटाटा : एकूण आवक 1,400 क्विंटल. भाव क्रमांक 1 - 1,200 रुपये, भाव क्रमांक 2 - 1,000 रुपये, भाव क्रमांक 3 - 800 रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति 10 किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे:

टोमॅटो 308 क्विंटल (1,000 ते 1,500 रुपये), कोबी 235 क्विंटल (500 ते 700 रु.), फ्लॉवर 215 क्विंटल (600 ते 1,200 रु.), वांगी 95 क्विंटल (1,500 ते 2,500 रु.), भेंडी 102 क्विंटल (2,000 ते 4,000 रु.), दोडका 62 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), कारली 72 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), दुधीभोपळा 63 क्विंटल (1,000 ते 1,500 रु.), काकडी 120 क्विंटल (800 ते 1,200 रु.), फरशी 33 क्विंटल (2,500 ते 3,500 रु.), वालवड 44 क्विंटल (3,000 ते 5,000 रुपये), ढोबळी मिरची 122 क्विंटल (4,000 ते 5,000 रु.), चवळी 33 क्विंटल (2,000 ते 3,000 रु.), वाटाणा 45 क्विंटल (3,500 ते 4,500 रुपये), शेवगा 39 क्विंटल (2,000 ते 4,000 रु.), गाजर 75 क्विंटल (1,200 ते 1,600 रु.), गवार 50 क्विंटल (5,000 ते 7,000 रु.), आले 130 क्विंटल (3,000 ते 4,500 रुपये).

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे:

मेथी - एकूण 19 हजार 590 जुड्या (400 ते 700 रुपये), कोथिंबीर - एकूण 24 हजार 170 जुड्या (300 ते 700 रुपये), शेपू - एकूण 2 हजार 50 जुड्या (600 ते 1,000 रुपये), पालक - एकूण 2 हजार 540 जुड्या (300 ते 600 रुपये).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT