Pune Vegetable Market: पुण्यात फळभाज्यांचे दर घसरले; गॅस तुटवड्याचा परिणाम

हॉटेल व्यवसायावर परिणाम, मागणी घटली; कारली, टोमॅटो, मिरचीसह दर 10-20% नी कमी
vegetable price fluctuation
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: आखातातील युद्धपरिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरातील हॉटेल-खानावळींमधील अनेक खाद्यपदार्थांवर मर्यादा आल्या आहेत. परिणामी, येथून गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात होणाऱ्या फळभाज्यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे.

vegetable price fluctuation
Pune Fruit Market Rates: पुणे फळबाजारात दर घसरले; रमजाननंतर मागणी कमी

बाजारातील आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मात्र, मागणी अभावी कारली, दोडके, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, हिरवी मिरची, शेवगा, तोतापुरी कैरीच्या भावात सुमारे दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली आहे. तर उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

vegetable price fluctuation
Pune Onion Price Fall: पुण्यात कांद्याचे दर कोसळले; आखाती युद्धाचा फटका

घाऊक बाजारात रविवारी (दि. 22) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे 90 ते 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे 15 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 4 ते 5 टेम्पो, गाजर राजस्थान आणि दिल्ली येथून प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, तर इंदौर येथून 5 ते 6 टेम्पो, मध्य प्रदेश मटार 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 3 टेम्पो, भुईमुग शेंग कर्नाटक आणि गुजरात येथून प्रत्येकी 2 ते 3 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 टेम्पो, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 7 ते 8 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे 10 टेम्पो, तर इंदौर, आग्रा गुजरात आणि स्थानिक भागातून बटाट्याची 30 टेम्पो इतकी आवक झाली.

vegetable price fluctuation
Pune Fish Market Rates: पुणे मासळी बाजारात कमी आवक; दर तेजीत कायम

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 700 ते 800 गोणी, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 टेम्पो, टोमॅटो 8 ते 10 हजार क्रेटस, हिरवी मिरची 3 टेम्पो, काकडी 8 टेम्पो, फ्लॉवर 10 टेम्पो, कोबी 5 टेम्पो, ढोबळी मिरची 10 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, गाजर 2 ते 3 टेम्पो, घेवडा 2 ते 3 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, मटार 8 ते 10, शेवगा 3 ते 4 टेम्पो कांदा सुमारे 100 टेम्पो इतकी आवक झाली.

vegetable price fluctuation
Maharashtra Sugar Industry Meeting: साखर उद्योगावर मुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; कर्ज, FRP आणि इथेनॉल प्रश्नांवर चर्चा

कोथिंबिर, पुदीना, चुका, चाकवत महाग; उर्वरित पालेभाज्या स्थिर

मार्केट यार्डात कोथिंबिरीची आवक घटली आहे. मागील आठवड्यात दीड लाख जुडी आवक झालेल्या कोथिंबिरीची आज (रविवार दि.22) सव्वा लाख जुडी आवक झाली. त्यामुळे कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे 3 रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात जुडीला दर्जानुसार 7 ते 15 रुपये भाव मिळत आहे. याबरोबरच आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे पुदीना, चुकाच्या भावात जुडीमागे प्रत्येकी 2 रुपये, तर चाकवतच्या भावात 1 रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. मेथीची 60 हजार जुडी आवक नोंदविण्यात आली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असून, जुडीला दर्जानुसार 8 ते 12 रुपये भाव मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news