Green Chilli Pudhari
पुणे

Chakan Market Yard Vegetable Prices: चाकण बाजारात भाजीपाल्याची विक्रमी आवक; हिरवी मिरची तेजीत, पालेभाज्यांचे दर घसरले

महात्मा फुले मार्केट यार्डात ५ कोटी ५० लाखांची उलाढाल; कांदा-बटाटा स्थिर, लसणाला १७ हजारांचा उच्चांकी भाव

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये हिरवी मिरची, वांगी, कोबी, काकडीची प्रचंड आवक झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर व पालक भाजीच्या दरात घसरण झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ५० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १ हजार क्विंटल झाली. कांद्याला कमाल भाव १ हजार ते २ हजार ५०० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक २ हजार क्विंटल झाली. बटाट्याला कमाल भाव १ हजार ५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक २५ क्विंटल झाली. लसणाचा कमाल भाव १७ हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २१० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ६ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा : एकूण आवक- १,००० क्विंटल. भाव क्रमांक- १. २,५०० रुपये, भाव क्रमांक २. २,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,००० रुपये. बटाटा : एकूण आवक-‌ २,००० क्विंटल. भाव क्रमांक १. १,५०० रुपये, भाव क्रमांक २. १,००० रुपये, भाव क्रमांक ३.८०० रुपये.

फळभाज्या : फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रती दहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो- २९५ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), कोबी- १६० क्विंटल (१,००० ते २,००० रु.), फ्लॉवर- २२७ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), वांगी- ९८ क्विंटल (१,००० ते २,००० रु.), भेंडी- ९२ क्विंटल (२,००० ते ४,००० रु.), दोडका- ६४ क्विंटल (२,००० ते ४,००० रु.), कारली- ७६ क्विंटल (२,००० ते ३,००० रु.), दुधी भोपळा- ६८ क्विंटल (१,५०० ते ३,००० रु.), काकडी- १०५ क्विंटल (१,००० ते १,५०० रु.), फरशी- ८ क्विंटल (३,००० ते ६,००० रु.), वालवड- ६८ क्विंटल (२,००० ते ३,००० रुपये), ढोबळी मिरची- १३० क्विंटल (२,००० ते ४,००० रु.), चवळी- २८ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), शेवगा- ४८ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), गाजर- १४० क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.), गवार- ४९ क्विंटल (५,००० ते ७,००० रु.), आले- १६० क्विंटल (८,००० ते १३,००० रुपये).

पालेभाज्या : चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : मेथी-एकूण १० हजार १८५ जुड्या (१,००० ते २,००० रुपये), कोथिंबीर-एकूण २५ हजार ७४५ जुड्या (५०० ते १,३०० रुपये), शेपू- एकूण ३ हजार ५४९ जुड्या (६०० ते १,००० रुपये), पालक-एकूण ३ हजार ९३९ जुड्या (५०० ते ८०० रुपये).

जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३५ जर्सी गायींपैकी ३० गायींची विक्री झाली (१५,००० ते ७०,००० रु.). ६० बैलांपैकी ५० बैलांची विक्री झाली (१०,००० ते ४०,००० रु. ). ११० म्हशीपैकी ७० म्हशीची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रु. ). १२,५०० शेळ्या-मेंढ्यांपैकी १०,५०० शेळ्यांची विक्री झाली असून, त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT