Onion Pudhari
पुणे

Chakan Market Onion Prices: चाकण बाजारात कांद्याचा भाव वधारला; पालेभाज्या आणि तरकारी माल स्वस्त

कांद्याची आवक घटल्याचा दरावर परिणाम; महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये ५ कोटी १० लाखांची उलाढाल

पुढारी वृत्तसेवा

अविनाश दुधवडे

चाकण: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भावात वाढ झाली. पालेभाज्यांची आवक वाढल्याने भाव घसरले. हिरवी मिरची, भेंडीसह तरकारी मालाच्या भावात घट झाली. एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपये झाली.

कांद्याची एकूण आवक १ हजार २०० क्विंटल झाली. कांद्याला कमालभाव १,५०० ते ४,००० रुपये मिळाला. बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. बटाट्याला कमालभाव १,५०० रुपये मिळाला. लसणाची एकूण आवक ३५ क्विंटल झाली. लसणाचा कमालभाव १८ हजार रुपयांवर पोहोचला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २८५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार रुपयांपासून ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे : कांदा-एकूण आवक- १,२०० क्विंटल. भाव क्रमांक- १.४,००० रुपये, भाव क्रमांक २. ३,००० रुपये, भाव क्रमांक ३. १,५०० रुपये, बटाटा- एकूण आवक-‌ १,५०० क्विंटल. भाव क्रमांक १.१,५०० रुपये, भाव क्रमांक २.१,२०० रुपये, भाव क्रमांक ३.८०० रुपये.

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतिदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात रुपयांत पुढीलप्रमाणे-टोमॅटो-२९३ क्विंटल : (६०० ते १,३००), कोबी-२१० क्विंटल (७०० ते १,५००), फ्लॉवर-१९५ क्विंटल (१,००० ते १,८००), वांगी-९२ क्विंटल (१,००० ते २,०००), भेंडी-९२ क्विंटल (१,००० ते २,०००), दोडका-५६ क्विंटल (१,५०० ते ३,५००), कारली-६८ क्विंटल ( १,५०० ते ३,५००), दुधीभोपळा-४७ क्विंटल (१,०० ते २,५००), काकडी-७८ क्विंटल (१,००० ते २,०००), फरशी-२० क्विंटल (२,५०० ते ३,०००), वालवड-६४ क्विंटल (१,५०० ते ४,०००), ढोबळी मिरची-१३६ क्विंटल (१,००० ते २,५००), चवळी-२८ क्विंटल (२,००० ते ३,५००), शेवगा-३० क्विंटल (३,००० ते ४,५००), गाजर-१५० क्विंटल (१,५०० ते २,०००), गवार-३८ क्विंटल (४,००० ते ८,०००), आले-१७५ क्विंटल (५,००० ते १२,०००).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे-मेथी-एकूण १० हजार १२४ जुड्या (७०० ते १,४०० रुपये), कोथिंबीर-एकूण ३१ हजार ७४५ जुड्या (१०० ते ५०० रुपये), शेपू-एकूण ५ हजार ९५ जुड्या (१०० ते ५०० रुपये), पालक-एकूण ४ हजार ३८ जुड्या (३०० ते १,००० रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ७० जर्सी गायींपैकी ६० गायींची विक्री झाली. (५,००० ते ७०,००० रुपये), ११० बैलांपैकी ८० बैलांची विक्री झाली. (१०,००० ते ४०,००० रुपये), १६० म्हशींपैकी १२० म्हशींची विक्री झाली. (३०,००० ते ८०,००० रुपये), ६,०००

शेळ्या : मेंढ्यापैकी ५,१०० शेळ्यांची विक्री झाली असून, त्यांना २,००० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT