New Police Station  Pudhari
पुणे

Chakan Police Station Division: चाकण-महाळुंगे पोलिस ठाण्यांच्या विभाजनावर वाद

रस्त्याच्या मधोमध हद्द ठरवल्याने नागरिकांची गैरसोय; एकाच गावासाठी वेगवेगळे पोलिस ठाणे

पुढारी वृत्तसेवा

चाकण: चाकण आणि महाळुंगे पोलिस ठाण्याचे विभाजन करून चार पोलिस ठाणी करण्यात आली आहेत. चाकण आणि महाळुंगे पोलिस ठाण्याचे विभाजन करताना अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या मध्यापासून हे विभाजन झाल्याने एकाच गावातील रस्त्याच्या अलीकडे आणि पलीकडे असणाऱ्या नागरिकांना वेगवेगळ्या आणि दूरवरच्या पोलिस ठाण्यात जावे लागणार आहे. एवढी असुविधा होत असताना देखील कुणीही याबाबत एक शब्द देखील बोलण्यास तयार नाही.

दरम्यान, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे भांबोली फाटा येथे सुरू करण्यात आले आहे, तसेच दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे हे जुन्या पोलिस ठाण्याच्या जागीच आहे. उत्तर चाकण पोलिस ठाणे हे जुन्या चाकण पोलिस ठाण्यात सुरू करण्यात आले आहे, तर दक्षिण चाकण पोलिस ठाणे हे कडाचीवाडी येथे सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दी या तळेगाव-चाकण, चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या मध्यापासून दुतर्फा करण्यात आलेल्या आहेत.

उत्तर चाकण पोलिस ठाण्याची हद्द

चाकण (तळेगाव-शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) मेदनकरवाडी (तळेगाव-शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग), कडाचीवाडी (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) , बिरदवडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, रोहकल, भाम संतोषनगर, रासे (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग), भोसे (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) , शेलगाव (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग), काळुस, दौंडकरवाडी, पिंपळगाव (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) मोहितेवाडी (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग), चिंचोशी, बहुळ (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग), साबळेवाडी (शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) अशी उत्तर चाकण पोलिस ठाण्याची हद्द असणार आहे,

चाकण दक्षिण पोलिस ठाणे हद्द

चाकण (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), नाणेकरवाडी, मेदनकरवाडी (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), रासे (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), भोसे (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), शेलगाव (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), पिंपळगाव (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), मोहितेवाडी ( शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), बहुळ (शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), सिद्धेगव्हाण, साबळेवाडी ( शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), वडगाव घेणंद, कोयाळी, अशी चाकण दक्षिण पोलिस ठाणे हद्द असणार आहे.

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे

महाळुंगे (तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग) , खराबवाडी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), खालुंबे (तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या दक्षिणेकडील भाग), येलवाडी, सांगुर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण , कुरुळी (पुणे-नाशिक महामार्गासह पश्चिमेकडील भाग) , मोई, निघोजे.

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे

महाळुंगे (तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) , खराबवाडी (तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग), खालुंबे (तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गासह उत्तरेकडील भाग) तोरणे बुद्रुक, पराळे, शिवे, शिंदे वहागाव, वासुली, देशमुखवाडी, भांबोली, कासारी, वराळे, हेद्रुज, आंबेठाण, पाळू, कोरेगाव खुर्द, अनावळे, बोरदरा, कोळीये, सावरदरी, गडद, पाईट, आडगाव करंजविहिरे, सुपे, शेलू, कोहिंडे खुर्द, आसखेड खुर्द, आसखेड बुद्रुक वेल्हावळे, वाघू ,धामणे, कान्हेवाडी खुर्द, वाकी तर्फे वाडा, टेकवडी तळवडे, कुरकुंडी, रौंधळवाडी, अहिरे, गोनवडी, पिंपरी खुर्द अशी सुमारे 44 गावे उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT