file photo  
पुणे

Pune Crime news : खंडणी उकळणार्‍या महिलेसह पित्याला बेड्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अपरिचित असलेल्या महिलेची ओळख करून ती महिला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याचे सांगत तिच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकाकडून वेळोवेळी 30 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी महिलेसह तिच्या वडिलांना बेड्या ठोकल्या. महिलेकडून आतापर्यंत पोलिसांनी 23 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्योती बनसोडे ऊर्फ ज्यो ऊर्फ ज्योती रामचंद्र कोरडे ऊर्फ ज्योती संतोष पारे व रामचंद्र बापू कोरडे (दोघेही रा. आंबेडकरनगर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाबरोबर आरोपी ज्योती या महिलेचे मैत्रीचे संबंध होते. याच मैत्रीच्या संबंधातून तिने एका दुसर्‍या महिलेशी ओळख करून दिली. अनोळखी महिलेची वृद्ध नागरिकाबरोबर दोन ते तीन वेळा भेट झाली. याच वेळी ज्योतीने तक्रारदारांना फोन करून ओळख करून दिलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्या महिलेच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर असल्याची व पोलिस तुम्हालाही अटक करणार असल्याची धमकी दिली. ते तुमचा पत्ता मागत आहेत, अशी भीती घातली.

त्यावर ज्योतीने तक्रारदाराला घाबरवून तुमच्याऐवजी माझ्या वडिलांचे म्हणजे रामचंद्र कोरडे याचे नाव पोलिस केसमध्ये टाकून तुम्हाला वाचविते, अशी बतावणी मारत पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर घाबरून जाऊन तक्रारदाराने जुलै 2023 पासून ज्योतीला तब्बल 30 लाख 30 हजार रुपये दिले. तक्रारदाराने दिलेला धनादेश ज्योतीने आपल्या वडिलांच्या बँक खात्यावर वटविला. खटला व इतर गोष्टी मॅनेज करण्यासाठी ज्योतीने तक्रारदारांची सिटी प्राईड थिअटरच्या शेजारी भेट घेतली.

तेथे ज्योतीने तक्रारादाराला पुन्हा 5 लाख व दरमहा एक लाख द्यावे लागतील, असे खोटे सांगितले. परंतु, याप्रकरणात आपण गुंतत चाललो असल्याचे व आपली फसवणूक होत असल्याचे कळल्यानंतर तक्रारदाराने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास केला असता ज्योती हिचे नाव निष्पन्न झाले. तिने खंडणी उकळण्यासाठी हे सगळे नाटक केल्याचे उघड झाले. दरम्यान, तिला अटक करून केलेल्या तपासात ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार किशोर पोटे, नागेश पिसाळ, अमित जाधव यांच्या पथकाने केली.

ज्योती बनसोडे ऊर्फ ज्यो ऊर्फ ज्योती रामचंद्र कोरडे ऊर्फ ज्योती संतोष पारे व रामचंद्र बापू कोरडे (दोघेही रा. आंबेडकरनगर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाबरोबर आरोपी ज्योती या महिलेचे मैत्रीचे संबंध होते. याच मैत्रीच्या संबंधातून तिने एका दुसर्‍या महिलेशी ओळख करून दिली. अनोळखी महिलेची वृद्ध नागरिकाबरोबर दोन ते तीन वेळा भेट झाली.

याच वेळी ज्योतीने तक्रारदारांना फोन करून ओळख करून दिलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्या महिलेच्या मोबाईलमध्ये तुमचा नंबर असल्याची व पोलिस तुम्हालाही अटक करणार असल्याची धमकी दिली. ते तुमचा पत्ता मागत आहेत, अशी भीती घातली. त्यावर ज्योतीने तक्रारदाराला घाबरवून तुमच्याऐवजी माझ्या वडिलांचे म्हणजे रामचंद्र कोरडे याचे नाव पोलिस केसमध्ये टाकून तुम्हाला वाचविते, अशी बतावणी मारत पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

त्यावर घाबरून जाऊन तक्रारदाराने जुलै 2023 पासून ज्योतीला तब्बल 30 लाख 30 हजार रुपये दिले. तक्रारदाराने दिलेला धनादेश ज्योतीने आपल्या वडिलांच्या बँक खात्यावर वटविला. खटला व इतर गोष्टी मॅनेज करण्यासाठी ज्योतीने तक्रारदारांची सिटी प्राईड थिअटरच्या शेजारी भेट घेतली. तेथे ज्योतीने तक्रारादाराला पुन्हा 5 लाख व दरमहा एक लाख द्यावे लागतील, असे खोटे सांगितले. परंतु, याप्रकरणात आपण गुंतत चाललो असल्याचे व आपली फसवणूक होत असल्याचे कळल्यानंतर तक्रारदाराने मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे निरीक्षक स्वप्नाली शिंदे, उपनिरीक्षक युवराज शिंदे यांनी गुन्ह्याचा तपास केला असता ज्योती हिचे नाव निष्पन्न झाले.

तिने खंडणी उकळण्यासाठी हे सगळे नाटक केल्याचे उघड झाले. दरम्यान, तिला अटक करून केलेल्या तपासात ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार किशोर पोटे, नागेश पिसाळ, अमित जाधव यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT