मंचर: मंचर (ता. आंबेगाव) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात एकूण 9 हजार 471 डाग तरकारी शेतमालाची आवक झाली. फ्लॉवरची (फुलकोबी) आवक तुलनेत कमी असल्याने त्याच्या बाजारभावात तेजी दिसून आली. 10 किलोला 280 रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
मंचर बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर आणि शिरूर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. या बाजार समितीची खासियत म्हणजे शेतमाल विक्रीनंतर शेतकर्यांना लिलावादरम्यानचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम, याची माहिती एसएमएस आणि मोबाईल अॅपद्वारे तत्काळ कळते. त्यामुळे पाच तालुक्यांतील शेतकरी या बाजार समितीवर विश्वास ठेवून आपली आवक येथे पाठवतात, असेही थोरात यांनी सांगितले. (Latest Pune News)
रविवारच्या बाजारभावानुसार 10 किलोला मिळालेले दर पुढीलप्रमाणे (शेतमाल, आवक-डाग, किमान ते कमाल दर रुपये) : कारले (33) : 350-570, गवार (417) : 500-1000, घेवडा (15) : 500-1000, चवळी (68) : 300-500, ढोबळी मिरची (74) : 300-625, भेंडी (127) : 400-751, फरशी (23) : 500-1000, फुलकोबी (प्लॉवर) (1731) : 200-280, भुईमूग शेंगा (375) : 251-550, दोडका (56) : 350-650, मिरची (854) : 300-650, तोंडली (29) : 200-480, शेवगा (8) : 400-800, लिंबू (10) : 300-400, काकडी (478) : 200-350, कोबी (352) : 70-160, वांगी (141) : 300-600, दुधी भोपळा (119) : 150-300, बीट (1004) : 150-251, आले (29) : 300, टोमॅटो (79) : 200-370, मका (724) : 50-160, कैरी (54) : 200-400, पापडी (5) : 700-900, डांगर भोपळा (3) : 100. वरील दर बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिले.