Cauliflower price hike in Manchar
मंचर: कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि.10) तरकारीची एकूण 9805 डाग आवक झाली. फ्लॉवरला मागील आठवड्यात दहा किलोला 50 ते 130 रुपये बाजारभाव होता. सद्य:स्थितीत 100 ते 251 रुपये याप्रमाणे भावात तेजी आली आहे. आवक घटल्याने बाजारभावात वाढ झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर, शिरूर या भागातून मोठ्या प्रमाणावर तरकारीची आवक होते. शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतमालाचे वजन, बाजारभाव व एकूण रक्कम याचा एसएमएस मोबाईल अॅपद्वारे शेतकर्याच्या मोबाईलवर दिला जातो. यामुळे पाच तालुक्यातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येथे घेऊन येतात, असे सभापती थोरात यांनी सांगितले. (Latest Pune News)
प्रतिदहा किलोला मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे- कंसात आवक : कारले (169) 235-420, गवार (412) 325-600, घेवडा (82) 265-500, चवळी (189) 210-390, ढोबळी मिरची (122) 275-500, भेंडी (189) 210-370, फरशी (252) 325-550, फ्लॉवर (3556) 100-251, भुईमूग शेंगा (2) 350-570, दोडका (53) 215-400, मिरची (116) 440-800, तोंडली (20) 100-450, लिंबू (4) 150, काकडी (895) 100-150, कोबी (1325) 30-80, वांगी (90) 165-300, दुधी भोपळा (132) 140-260, बीट (1074) 140-251, आले (47) 150-250, टोमॅटो (141) 100-780, मका (704) 50-100, पावटा (2) 300, वालवड (30) 570, राजमा (35) 200-470, बटाटा (2) 120, शेवगा (10) 100-500, वाटाणा (26) 400-851, पापडी (7) 570, आंघोरा (12) 70-110. तरकारीला चांगला भाव मिळत असल्याचे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.