पुण्यात कारची विक्री वाढली, दुचाकींची घटली Pudhari
पुणे

Pune: पुण्यात कारची विक्री वाढली, दुचाकींची घटली

एप्रिलमध्ये 18.11 लाख वाहने रस्त्यावर; एकूण वाहन विक्रीत 13 टक्के घट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मोटारसायकल, मोपेड, स्कूटर अशा सर्व प्रकारच्या दुचाकींची विक्री एप्रिल महिन्यात 16 टक्क्यांहून अधिक घटली असून, कारची विक्री साडेपाच टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील एकूण वाहन विक्री गतवर्षीच्या तुलनेत 13.3 टक्क्यांनी घटून 18 लाख 11 हजार 876 वर आली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे.

देशातील एकूण वाहन विक्रीत दुचाकींचा वाटा सर्वाधिक असतो. एप्रिल 2024 मध्ये एकूण 20 लाख 88 हजार 932 वाहने रस्त्यावर आली होती. त्यातील 17 लाख 51 हजार 393 वाहने दुचाकी होती. यंदा, 18 लाख 11 हजार 876 पैकी 14 लाख 58 हजार 784 वाहने दुचाकी आहेत. (Latest Pune News)

गतवर्षीपेक्षा यंदा दुचाकींची विक्री 16.7 टक्क्यांनी घटली आहे. त्यातही मोटारसायकलची विक्री 11 लाख 28 हजार 192 वरून 8 लाख 71 हजार 666 वर (22.7 टक्के घट) घसरली आहे. स्कूटरची विक्री 5 लाख 81 हजार 277 वरून 5 लाख 48 हजार 370 आणि मोपेडची विक्री 41 हजार 924 वरून 38,748 वर आली आहे.

कारची विक्री गत एप्रिलच्या तुलनेत 2 लाख 87 हजार 746 वरून 3 लाख 3 हजार 648 वर गेली आहे. त्यातही एसयूव्ही कारची विक्री 12.1 टक्क्यांनी वाढून 2 लाख 1 हजार 62 वर गेली आहे. गतवर्षी 1 लाख 79 हजार 329 एसयूव्ही रस्त्यावर आल्या होत्या. यंदाही कार विक्रीत स्पोर्टस् लूक असणार्‍या कारचा वरचष्मा राहिला आहे. साधारणत:, कारची विक्री 96,357 वरून 91,148 वर (5.4 टक्के घट) घसरली आहे. व्हॅनची विक्री 12 हजार 60 वरून 11 हजार 438 वर आली आहे.

तीनचाकी श्रेणीतील वाहनांची विक्री 49,774 वरून 49,441 वर (0.7 टक्के घट) आली आहे. प्रवासी रिक्षांची विक्री 39,383 वरून 40,167 वर गेली आहे. ई-रिक्षांची मागणी 1 हजार 308 वरून 830 वर आली आहे. ई-कार्टची मागणी 265 वरून 309 वर गेली आहे. मालवाहतूक करणार्‍या तीनचाकींची विक्री 8,818 वरून 8,135 वर घसरली आहे.

एप्रिलमधील उत्पादनातही घट

एप्रिल 2024 च्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमधील वाहनांचे एकूण उत्पादन 23 लाख 58 हजार 611 वरून 23 लाख 18 हजार 882 वर (1.7 टक्के घट) आले आहे. कारचे उत्पादन 3 लाख 51 हजार 290 वरून 3 लाख 89 हजार 202 (10.8 टक्के वाढ) झाले आहे. त्यातही एसयूव्हीचे उत्पादन 2 लाख 6 हजार 585 वरून 2 लाख 41 हजार 529 वर गेले आहे. तर, कारचे उत्पादन 1 लाख 31 हजार 846 वरून 1 लाख 35 हजार 819 वर (3 टक्के वाढ) गेले आहे. व्हॅनचे उत्पादन 12,859 वरून घटून 11 हजार 854 वर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT