पुणे

ऑनलाइन लॅपटॉप खरेदी पडली महागात

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन खरेदी केलेल्या लॅपटॉपच्या बॉक्समध्ये दोन किलो मिठाच्या पुड्या निघाल्या. हा प्रकार वल्लभनगर, पिंपरी येथे 10 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला.

डॉ. जना प्रणित जोशी (43, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 28) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अ‍ॅमेझॉन कंपनीतील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने अ‍ॅमेझॉन इंडिया या कंपनीकडून 63 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप ऑनलईन खरेदी केला.

त्यानुसार, मेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने त्यांच्याकडे लॅपटॉपचा बॉक्स दिला. फिर्यादी यांनी तो बॉक्स उघडून पाहिले असता त्यांना लॅपटॉपऐवजी आतमध्ये दोन किलो मिठाच्या पुड्या व खाकी कागद असल्याचे दिसून आले.

फिर्यादी यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, अज्ञात आरोपींवर लॅपटॉपचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

https://youtu.be/CC-Mfl9S1j8

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT