पुणे

Pune Crime News : मेहुण्याने दाजीला हातोड्याने मारले; गुन्हा दाखल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मेहुण्याने दाजीला डोक्यात हातोडीने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. राहुल दोडामणी (वय 40, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या दाजीचे नाव आहे. याप्रकरणी संचिता दोडामणी (वय 16) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलिसांनी हनुमान श्रीमंत नाईकोडी (वय 40) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिवतेजनगर बिबवेवाडी
येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील राहुल दोडामणी यांच्या मित्रांनी मामाच्या (मेहुणा) घरासमोर येऊन शिवीगाळ केली होती. त्याचा राग आरोपी हनुमान याला आला होता. त्यातूनच त्याने राहुल यांना 'तू कोणालाही येथे आणून आम्हाला त्रास देतोय, शिवीगाळ करतोय,' असे म्हणत रागाच्या भरात शिवीगाळ करीत राहुल यांच्या डोक्यात हातोडी मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे पतंगे करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT