पुणे

पिंपरी : अद्ययावत वैद्यकीय उपचार, आपत्कालीन औषधांबाबत मंथन

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे) : येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या वतीने आपत्कालीन औषधविषयक ईएमइंडिया-2023 या 19 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जागतिक अद्ययावत वैद्यकीय उपचार आणि आपत्कालीन औषधांच्या क्षेत्रातील प्रगती, नवकल्पना आणि दृष्टीकोन या विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे.

ही परिषद दक्षिण पूर्व आशियातील इमर्जन्सी अँड ट्रॉमाविषयक जागतिक आरोग्य संघटना सहयोग केंद्र, आपत्कालीन औषधविषयक जागतिक शैक्षणिक परिषद आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एआयआयएमएस) नागपूर यांच्या सहकार्याने आणि अ‍ॅकेडेमिक कॉलेज ऑफ इमर्जन्सी एक्सपर्टस, इमर्जन्सी मेडिसिन असोसिएशन आणि आयएनडीयूएसईएमच्या (इनड्यूसेम) मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.

या पाच दिवसीय परिषदेला 23 तारखेपासून सुरुवात झाली आहे. परिषदेत सुरुवातीला आपत्कालीन औषध क्षेत्रातील तज्ञांची संवादात्मक कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्र घेण्यात आले. या सत्रांमध्ये इनड्यूसेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सागर गाळवणकर, डब्ल्यूएचओ कोलॅबोरेटिंग सेंटर फॉर इमर्जन्सी अ‍ॅन्ड ट्रामा केअरचे (दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्र) संचालक डॉ. संजीव भोई, नागपूर एआयआयएमएसमधील शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ पी. दुभाषी आदी उपस्थित होते.

डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रतिनिधी, क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. कल्पना केळकर, इमर्जन्सी मेडिसिन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा शिंदे, क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या सल्लागार डॉ. प्राची साठे, क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाचे प्रभारी सल्लागार डॉ. प्रशांत साखवळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, आम्ही अशा अनेक परिषदांचे आयोजन करण्यासाठी आणि देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता व आरोग्यसेवा आणि नवकल्पनांमध्ये नेतृत्व मिळवून देण्यासाठी उत्सुक आहोत. डॉ. यशराज पाटील म्हणाले, आम्ही आरोग्य सेवा क्षेत्रात रुग्णकेंद्रित वैद्यकीय प्रगती करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहोत. विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, जगातील सर्वांत मोठ्या इमर्जन्सी मेडिसिन परिषदेचे आयोजन करण्याचा मान आम्हांला मिळाला, याचा आम्हांला अभिमान आहे.

डॉ. कल्पना केळकर म्हणाल्या की, एसीईई आणि इनड्युसेमच्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नांना फळ मिळत असल्याचे दिसत आहे.
डॉ. सागर गाळवाणकर म्हणाले की, देशातील नागरिकांच्या हितासाठी आपत्कालीन औषध क्षेत्र आणि आपत्कालीन औषधसेवा विकसित करण्यासाठी इनड्युसेमनेची ही चळवळ गेेले 20 वर्षाांपासून सुरु आहे. डॉ. संजीव भोई म्हणाले, आपत्कालीन औषधांच्या महत्त्वाबाबत जनजागृती वाढत आहे. प्रशिक्षित शिक्षकांच्या कमतरतेमुळे या विषयाच्या अध्यापनात अडथळे येत आहेत.

शैक्षणिक परिषदेस सुरुवात

शनिवारपासून (दि. 26) शैक्षणिक परिषदेस सुरुवात झाली आहे. या परिषदेस डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ इमर्जन्सी मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. जोनाथन जोन्स, अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ इमर्जन्सी मेडिसिनच्या माजी अध्यक्षा डॉ. लिझा मोरेनो-वॉल्टन यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित
राहणार आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT