जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्रीखंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दहा दिवस पाणी न आल्याने नागरिकांनी जेजुरी नगरपालिकेत संताप व्यक्त केला. महिलांनी पाण्यासाठी आक्रोश केला. आगामी आठ दिवसांत नियमित पाणी न मिळाल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा जेजुरीकर नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला.
तीर्थक्षेत्र जेजुरीनगरीत मागील दोन महिन्यांपासून अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
त्यातच 10 दिवस पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर जेजुरीकर नागरिक व महिलांनी जेजुरी नगर परिषदेत जाऊन मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा केली. या बैठकीवेळी वीर धरणातून कायम शाश्वत स्वरूपी पिण्यासाठी पाणी द्यावे, 25 वर्षे मागणी करूनही जेजुरी शहराला वीर धरणाचे पाणी का मिळत नाही, याचा उलगडा करणे आदी विषय मांडण्यात आले. 8पान 2 वर
सोशल मीडियावर 'नणंद नको भावजय नको, जेजुरीकरांना पाणी द्या', तसेच 'लोकसभा निवडणुकीवर जेजुरीकरांचा बहिष्कार', 'जेजुरीकरांना पाणी द्या' अशा पोस्ट टाकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा