Book Talk Trend Pudhari
पुणे

Book Talk Trend: सोशल मीडियावर वाढतोय ‌‘बुक टॉक‌’ ट्रेंड

तरुणाई रील्स, यू-ट्यूब शॉट्‌‍र्समधून करून देतेय मराठी पुस्तकांची ओळख पुस्तकांवरील चर्चांना पसंती

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डिजिटल युगात वाचनसंस्कृती कमी होत असल्याचे बोलले जात असतानाच सोशल मीडियावर ‌‘बुक टॉक‌’ हा नवा सांस्कृतिक ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे.

‌‘बुक टॉक‌’ अर्थात पुस्तकांवर आधारित चर्चा, समीक्षा आणि अनुभव मांडणाऱ्या रील्सचा ट्रेंड तरुणाईमध्ये वाढला असून, इन्स्टाग््रााम रील्स, फेसबुक व्हिडीओ आणि यू-ट्यूब शॉट्‌‍र्सच्या माध्यमातून तरुण-तरुणी आता मराठी पुस्तकांविषयी बोलताना दिसत आहेत.

30 सेकंद ते एका मिनिटांच्या रील्स, व्हिडीओंमधून पुस्तकांचे कथानक, लेखकाची शैली, सामाजिक संदर्भ, पुस्तकातील प्रभावी ओळी आणि स्वतःचा वाचन अनुभव तरुणाई शेअर करत आहे. त्यामुळे पुस्तकांवरील चर्चा आता केवळ ग््रांथालये, साहित्य संमेलने किंवा अभ्यासगटांपुरती मर्यादित न राहता ती थेट सोशल मीडियावर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, मराठी पुस्तकांवर आधारित रील्स तयार करणाऱ्या कंटेट क्रिएटर्स, बुक ब्लागर्सची संख्याही वाढताना दिसत आहे. रहस्यकथा, ऐतिहासिक कादंबऱ्या, आत्मचरित्रे, कवितासंग््राह, प्रवासवर्णने, अशा विविध साहित्यप्रकारांवरील रील्स, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

काही कंटेंट क्रिएटर्स पुस्तकातील एखादा भावनिक प्रसंग सादर करताना दिसत आहेत, तर काही जण पुस्तकातील विचारांवर स्वतःचे मत व्यक्त करतात. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा विविध शहरांतील पुस्तकप्रेमी आणि कंटेंट क्रिएटर्स मराठी लेखकांच्या पुस्तकांवर आधारित रील्स तयार करत आहेत.

त्यामुळे व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, विश्वास पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकांची पुस्तके नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहेतच. त्याचबरोबर नवोदित लेखकांच्या पुस्तकांनाही सोशल मीडियामुळे नवे व्यासपीठ मिळत आहे.

तसेच, या ट्रेंडमुळे डिजिटल बुक क्लब आणि ऑनलाइन वाचन समूहही तयार झाले आहेत. पुस्तकांवर चर्चा, शिफारसी, पुस्तकांची देवाण-घेवाण आणि लेखकांशी संवाद, असे विविध उपक्रमही या माध्यमातून सुरू झाले आहेत.

कंटेंट क्रिएटर ईश्वरी सारंग म्हणाल्या, अनेक तरुण-तरुणी पुस्तकांवर आधारित रील्स तयार करत आहेत. पुस्तक वाचल्यानंतर त्यावरील अनुभव, समीक्षा, विचार, लेखकाची शैली आणि सामाजिक संदर्भांवर तरुणाई व्यक्त होत आहे.

मी देखील काही पुस्तकांवर आधारित रील्स तयार केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून पुस्तकांवर चर्चा वाढत आहे आणि अनेक जण पुस्तके विकत घेण्यासाठीही पुढाकार घेत आहेत.

इन्स्टाग््रााम, फेसबुक आणि यू-ट्यूबवर पुस्तकांवर आधारित रील्स पाहायला मिळत आहेत. तरुणाई पुस्तकांवर बोलत आहे, आपले विचार आणि अनुभव मांडत आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. विशेषतः मराठी साहित्यावरील रील्सला मिळणारी पसंती ही मराठी वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने आशादायी आहे.
- प्रसाद भडसावळे, ग््रांथ प्रसारक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT