पुणे

बिबट सफारीमुळे जुन्नर तालुक्याच्या वैभवात भर पडणार : आ. अतुल बेनके

Laxman Dhenge

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्पचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्यासाठी 82 कोटी 43 लाखाच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याने मनस्वी आनंद असून या प्रकल्पमुळे जुन्नर तालुक्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. या आराखड्यास दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रालय प्राधिकरणाकडून मान्यता घेतल्यावर कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. बेनके म्हणाले की,हा प्रकल्प बहूचर्चित झाला होता. अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. राजकीय टीका टिपणी होत होती.प्रत्यक्षात हे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मार्गी लागले आहे. विशेषतः मी आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हा माजी आमदार सोनवणे यांनी हा प्रकल्प कुठ पर्यंत नेला याची माहिती घेतली तेव्हा असे समोर आले की या प्रकल्पाची फक्त घोषणा झाली होती. डीपीआर, अधिसूनचा असे काहीच झालेले नव्हते.बारामती येथे बिबट सफारी होणार अशा काही लोकांनी अ?वा पसरविल्या. वास्तविक तेथे टायगर सफारी होणार आहे,त्यावेळी काही लोकांनी टीका केली होती. माझे मागणीवरून जिल्हा नियोजन मधून डीपीआर करण्यासाठी दीड कोटी रुपये यापुर्वीच मंजूर करण्यात आले.

हा प्रकल्प अर्थसंकल्पात घेऊ असे त्यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता अजित पवार अर्थमंत्री झाल्यावर 82 कोटी 43 लाख रुपयांचा निधी टाकला.या बिबट सफारी प्रकल्प व्हावा म्हणून मी नेहमीच प्रयत्नशील होतो. माझ्या मागणीला आज खर्‍या अर्थाने यश आले याचा मला मनस्वी आनंद असल्याचे आ. बेनके यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT