भोसरी : पुढारी वृत्तसेवा : येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने रमजान ईद उत्साहत साजरी करण्यात आली. परिसरातील मशिदींमध्ये या वेळी सामुहिक नमाज पठण करण्यात आले. या वेळी मुस्लिम बांधवानी मोठी गर्दी केली होती. नमाज पठण केल्यानंतर एकमेंकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान ईदनिमित ईदगाह मैदान मशिद परिसरामध्ये रोषणाई करण्यात आली होती. ईदच्या निमिताने इदगाह मैदान फुलून गेला होती. भोसरीतील विविध ईदगाह मैदानांवर नमाजपठण करण्यात आले.
भोसरीतील सद्गुरुनगर येथील मस्जिद ए अम्मार ईदगाह मैदानावर मौलाना लतीफ शेख यांच्यावतीने सामूहिक नमाज पठण करण्यात आले. या वेळी मतीन पठाण, सादिक मुलानी, अस्लम शेख, कुदुब शेख, समीर पठाण, मुन्ना शेख यांसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते.
तसेच लांडेवाडी, दिघी येथील मशिदींमध्ये सामूहिक नमाजपठण करण्यात आले. या वेळी तोफिक खान, गायासुद्दिन खान, इब्रार खान, शहनाज अन्सारी, रेहमतुल्लाह अन्सारी आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
घरोघरी शिरखुर्मा बनविण्यात आला होता. तसेच, मुस्लिम बांधवांकडून घरी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भोसरीतील ईदगाह मैदानावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दापोडी : करोनाचे सर्व निर्बंध शिथिल केल्यानंतर प्रथमच मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करुन रमजान ईद उत्साहात साजरी केली.
दापोडी परिसरातील मशिदींमध्ये समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या वेळी जयदा मस्जिद गुलाबनगर दापोडी येथे मोलाना शफिक कारी यासीन यांनी नमाज पठण केले. आसिफ मणियार, मौलाना ताहीर शेख, शकील शेख, मौलाना खालील शेख व धनराज ढोले आदी उपस्थित होते.
मदरसा फैजुल उलूम एस. एम. एस. कॉलनी येथे कारी इकबाल यांनी नमाज पठण केले. या वेळी मोलाना उमर गाजी, सलीम शेख, अशिष भोसले, विनायक काटे, प्रतीक पवार, निखिल काटे आदी उपस्थित होते.
जामा मस्जिद बॉम्बे कॉलनी येथे खुशीद शेख यांनी नमाज पठण केले. या वेळी शौकत सुजार, हमीद मुलानी, गौरव कदम, निखिल मदने, ताजुद्दीन अत्तर आदी मान्यवर उपस्थित होते.
मज्जित उमर फारूक एज्युकेशन ट्रस्ट सिद्धार्थनगर दापोडी येथे कारी इमतियाज यांनी नमाज पठण केले. या वेळी समीर नदाफ, इर्शाद शेख, नईम काजी, जाफर शेख उपस्थित होते.
या वेळी भोसरी पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्करराव जाधव, पोलिस निरीक्षक गणेश पवार, पोलिस निरीक्षक नितीन लांडगे, बालाजी जोनापल्ले आदींनी उपस्थिती मुस्लिमांना बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आले.
या वेळी संतोष काटे,संजय काटे, राजू बनसोडे, कालीचरण पाटोळे, लक्ष्मीकांत बाराते आदी उपस्थित होते.
वाकड : परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांच्यावतीने सामूहिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर एकमेंकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
दोन वर्षांनंतर कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल केल्यामुळे नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. या वेळी मशिदींमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.