Bhor CNG Pipeline Pudhari
पुणे

Bhor CNG Pipeline Issue: भोरच्या सारोळ्यात सीएनजी पाइपलाइनवरून वाद; नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

महामार्गालगत पाइपलाइन टाकण्यावर नागरिकांचा आक्षेप; सुरक्षेच्या मुद्द्यावरून संताप

पुढारी वृत्तसेवा

वैभव धाडवे पाटील

सारोळा: भोर तालुक्यातील सारोळा येथे टोरेंट सीएनजी पंप व डेपो होत असल्यामुळे सीएनजी वाहनाना इंधन मिळण्याची मोठी सुविधा मिळणार आहे. मात्र, सारोळा येथील सीएनजी पंप सोबत डेपो असल्यामुळे महामार्गावर पुण्याच्या दिशेने उजव्या बाजूने 19.4 किलोमीटरपर्यंत टोरेंट कंपनी सीएनजी गॅससाठी ही वाहिनी उभारत आहे. महामार्ग ओलांडण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून औपचारिक मंजुरी मिळवली आहे.

महामार्गाच्या सेवारस्त्याला खेटूनच वाहिनी उभारण्याचे काम सुरू असल्याने नियमांची पायमल्ली होत असली तरी बेकायदेशीररीत्या खुलेआम काम रेटून नेले जात आहे. भविष्यात गॅसगळती अथवा काही कारणाने वाहिनी फुटल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच) व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाच्या नियमावलीनुसार महामार्गाचा सेवारस्ता सोडून 21 फुट पुढे वाहिनी गाडणे असणे गरजे आहे. त्याचबरोबर स्थायी इमारती पासून 15 मीटर अंतर ठेवणे गरजेचे असताना महामार्गाच्या सेवारस्त्या लगत अथवा एक ते तीन फुटांच्या अंतरावरून नेली जात आहे.

सध्या सुरू असलेले काम तत्काळ थांबवून कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. गॅस कंपनी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे. महामार्गावरील वाहतूक व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षता महत्त्वाची आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT