नसरापूर : जागतिक सायकल स्पर्धेत 40 देशांतील 176 सहभागी सायकलपटूंचे भोर व राजगड तालुक्यातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पारंपरिक मराठमोळ्या तालावर जल्लोषात स्वागत केले, तर प्रत्यक्षात रोमांचकारी सायकल स्पर्धा पाहताना नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
‘बजाज पुणे ग््राँड टूर- 2026’ च्या जागतिक सायकल स्पर्धा बुधवारी (दि. 21) पार पडल्या. दिवळे, कापूरहोळ, तेलवडी, मोहरी, हातवे, केतकावणे, दीडघर, वीरवाडी, जांभळी, कुरंगवडी, आंबवणे, करंजावणे, मांगदरी, कोळवडी, वांगणी, निगडे या गावांतील ग््राामस्थांसह शालेय विद्यार्थी, सामाजिक संघटनानी स्पर्धकांनी टाळ्यांच्या कडकडाट करून खेळाडूंचा उत्साह वाढविला. यानिमित्ताने दोन्ही तालुक्यांतील स्पर्धामार्गावरील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे, शिवकालीन इतिहास, वारकरी आणि सांकृतिक संस्कृती जगभर पोहोचवली.
जगभरातील स्टार खेळाडू यात असल्याने नागरिकांनी टीव्हीवर बघण्यापेक्षा स्पर्धेच्या मार्गावर जाऊन साक्षीदार झाले. स्पर्धकांचे वेग, शिस्त अनुभवत नागरिकांनी सायकलपटूंचे कौतुक केले. सायकलपटूंचा वेग, चपळता आणि जिद्द अशा रोमांचक दृश्यांचा अनुभव घेता आला. शालेय विद्यार्थांनी संस्कृतीनुसार ढोल-ताशे, विविध वेशभूषा साकारून कला सादर केल्या. सुरक्षेच्या दृष्टीने स्पर्धामार्गावर सुमारे 700 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कापूरहोळ ग््राामपंचायतीच्या वतीने मळे येथील शिवछत्रपती तरुण मंडळाच्या ढोल-लेझीम, शालेय विद्यार्थ्यांनी संस्कृतीनुसार विविध वेशभूषा साकारून कलेचे सादरीकरण केले. स्वागताची ही पद्धत आकर्षण ठरल्याचे उपसरपंच पंकज गाडे यांनी सांगितले.