Bhor Nasrapur Girl child Death Crime
माणिक पवार, नसरापूर
नसरापूर येथील एका निष्पाप साडेतीन वर्षाच्या बालिकेला नराधम वयोवृद्धाने जनावरांच्या गोठ्यात नेऊन खून केल्याची घटना घडली असून आरोपीने इतर घृणास्पद बाब केल्याचे संशय व्यक्त करत पुणे - सातारा महामार्गावर सध्या रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.
नसरापुर ( ता. भोर ) येथील एका लहान चिमुरडीवर वयोवृद्ध नराधने जनावरांच्या गोठ्यात पत्रावजा खोलीत खून केल्याची घटना घडली असून याप्रकरणी राजगड पोलिस तपास करत आहे. नसरापूर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. मात्र घटनेचे गांभीर्य वाढल्याने नागरिकात संतापाची लाट उसळल्याने थेट पुणे सातारा महामार्ग अडवून पिढीतला न्याय देण्याची मागणी व्यक्त केली जात आहे. सदर घटनेमुळे भोर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत पालकमंत्री येत नाही व पिडीतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
दरम्यान आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पुणे बंगळूर महामार्ग अडवून धरला असल्याने त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे आता या परिसरात अतिशय तणावाची स्थिती आहे ग्रामस्थांनी दोन यूट्यूबवरलाही पाठलाग करून मारल्याचे समजते